। रायगड । प्रतिनिधी ।
एसटी महामंडळाच्या 251 आगारांमध्ये 88 हजार पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी उत्कृष्ट काम करणार्या पहिल्या 5 चालक, 5 वाहक, 5 यांत्रिकी कर्मचार्यांचा आगार पातळीवर 1 ऑगस्टपासून दररोज गुणगौरव करण्यात येणार आहे.
प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा देणे, तिकीट विक्रीतून उत्पन्न वाढविणे, इंधन बचतीतून खर्च कमी करणे आणि गाडीची सुयोग्य देखभाल ठेवून तांत्रिक दृष्ट्या निर्दोष गाडी मार्गस्थ करणे, ही महत्त्वाची कामे प्रामुख्याने चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी करत असतात. त्यांच्या कामगिरीच्या जीवावर एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे.