। पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरातून कामाला जातो असे सांगून, करंजाडे येथून एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संतोष काशीनाथ देवरुखकर असे या बेपत्ता इसमाचे नाव असून त्याचे वय-51, अंगात हिरव्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असा त्याचा पेहराव असून त्याला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा बोलता येते. या इसमाबाबत माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दूरध्वनी क्र. – 022-27452333 किंवा पोहवा सुर्यकांत कुडावकर यांच्याशी संपर्क साधावा.