जेएनपीएच्या विश्‍वस्तपदी दिनेश पाटील, रविंद्र पाटील विजयी

। उरण । वार्ताहर ।
जेएनपीएच्या कामगार विश्‍वस्तपदी रविंद्र पाटील व दिनेश पाटील विजयी झाले आहेत. विश्‍वस्तपदाच्या दोन जागांसाठी 15 नोव्हेंबर रोजी निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जेएनपीएमध्ये 652 कामगार कार्यरत असून त्यापैकी 647 कामगारांनी मतदान केले. जेएनपीटी कामगार एकता संघटनेतर्फे उभे असलेले उमेदवार दिनेश पाटील यांना 291 मते, जेएनपीटी वर्कर्स यूनियन तर्फे रविंद्र रामदास पाटील यांना 161 मते, न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेतर्फे कॉम्रेड भूषण पाटील यांना 143 तर न्हावा शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स यूनियनला 52 मते मिळाली.

जेएनपीएच्या विश्‍वस्तपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते दिनेश पाटील यांना मिळाली असून त्यानंतर रविंद्र पाटील, कॉम्रेड भूषण पाटील यांना व सर्वात कमी मतदान न्हावा शेवा पोर्ट अँण्ड जनरल वर्कर्स युनियनला मिळाले. या निवडणुकीत प्रथम क्रमांकावर दिनेश पाटील, द्वितीय क्रमांकावर रविंद्र पाटील, तृतीय क्रमांकावर कॉम्रेड भूषण पाटील तर चौथ्या क्रमांकावर न्हावा शेवा पोर्ट अ‍ॅड जनरल वर्कर्स युनियन होती.

Exit mobile version