। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रत्नागिरी टाइम्सच्या रायगड आवृत्तीचे अलिबाग कार्यालयीन प्रमुख पत्रकार महेश पोरे यांचे ज्येष्ठ बंधू दिनेश दत्तात्रेय पोरे यांचे मंगळवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 56 वर्षांचे होते. नेव्हल डॉकियार्डमध्ये ते नोकरीस होते. मे 2022 मध्ये त्यांच्यावर एन्जोप्लास्टही करण्यात आली होती. त्यातून ते सावरत असताना मंगळवारी रात्री उरण-आंबिलवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी असताना अचानक त्याना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. केगाव-माणकेश्वर येथील वैकुंठभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे आप्तस्वकीय, मित्र, सहकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ, जावई, नात असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 11 ऑगस्ट रोजी उरण येथे, तर उत्तरकार्य रविवार, 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या आंबिलवाडी येथील निवायस्थानी होणार असल्याचे त्यांच्या आप्तस्वकीयांनी सांगितले.
पत्रकार महेश पोरे यांना बंधूशोक
