रातवड विद्यालयात दिपोत्सव

| माणगाव | वार्ताहर |

दिवाळी आणि किल्याच्या प्रतिकृती बनविण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. किल्यातून लहानगे इतिहास जतन व संवर्धनाचे काम करत असतात. शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानरचनावादी उपक्रम राबविणाऱ्या माणगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात दीपावली निमित्ताने दि.7 ते 9 नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दीपावली उत्सवाचे औचित्य साधून विद्यालयाने आकाशकंदील, भेटकार्ड व किल्ले बनविण्यात आले. विद्यार्थ्यांनी किल्ले रायगड, सिंहगड, प्रतापगड व शिवनेरी किल्याच्या प्रतिकृती उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गुरुवार दि. 9 नोव्हेंबर रोजी किल्ले प्रदर्शन व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले प्रदर्शन व दिपत्सव निमीत्ताने लेझिमच्या तालावर नृत्य करत दिपोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्यांची सजावट करुन आकर्षक रोषणाई करून दीपोत्सव साजरा केला. विद्यालयात प्रतिवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात मुख्याध्यापक एम.एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version