। माणगाव । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद वावे दिवाळी केंद्राचा माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे गुरुवार (दि.20) शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. जून 2023 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणार्या मुलांसाठी हा मेळावा घेण्यात आला.यावेळी अशोक काळे, महादेव जाधव, शृंगारी पाटील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन सदस्या, अंगणवाडी सेविका,मदतनीस आदी उपस्थित होते. दाखलपाञ विद्यार्थीनींकडून शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषाविकास,सामाजिक व भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी, अभिप्राय व मार्गदर्शन अशा विविध स्तरावरील खेळ,कृती करुन घेऊन त्यांना प्रबलन देण्यात आले. विद्यार्थी व उपस्थितांना खाऊ वाटप करुन मेळाव्याचा समारोप करण्यात आला.