| उरण | वार्ताहर |
दिव्यांग सामाजिक संस्था ही नेहमी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मदत करत असते. पिरकोण गावातील गरीब दिव्यांग महिला कल्पना गावंड यांच्या पतीचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यामुळे निराधार झालेल्या महिलेला दिव्यांग सामाजिक संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन आधार देण्याचे काम केले आहे.
कल्पना यांना एक लहान मुलगा आहे. नुकतेच त्यांच्या पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे मागील तीन महिने शासनाकडून मिळणारी पेन्शन न मिळाल्याने तसेच घरातील हालाखीची परिस्थिती या समस्येच्या विळख्यात सापडलेल्या कल्पना गावंड यांच्यासमोर मोठं संकट उभे राहिले होते. मात्र, या संकटातून त्यांना सावरण्यासाठी तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, समीर ठाकूर, महेश पाटील, नितीन सांगवीकर, हर्षदा घरत, रनीता ठाकूर व संदेश राजगुरू यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत करुन आधार देण्याचे काम केले आहे.







