वाघोडे येथे आपत्ती व्यवस्थापन शिबीर

। अलिबाग । वार्ताहर ।
वाघोडे येथे मरूआईमंदिर सभागृहात आपत्ती व्यवस्थापन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच कृष्णा जाधव, जयपाल पाटील, ग्रामसेवक निलेश गावंड, माजी सरपंच सुनील माने वसुधा पाटील, मुकेश नाईक ग्रामपंचायत सदस्य, डॉ, ामकृष्ण उघडे हे होते. प्रारंभी सरपंच कृष्णा जाधव यांनी रायगड भुषण जयपाल पाटील व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

जयपाल पाटील यांनी साप व विंचू दंश झाल्यास 108 रुग्णवाहिका बोलवावी अशी माहिती दिली. यावेळी डॉक्टर निर्मला डांगे 108 सहित उपस्थित झाल्या, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचा 112 क्रमांक वापर करतात पोयनाड पोलीस ठाणे वरून रोड्रिक्स, अमोल म्हात्रे मांजरेकर व जांभरे महिला पोलीस कार्यक्रम स्थळी उपस्थित झाल्या. गावातील महिलांना बाळंतपणासाठी नेण्यासाठी 102 रुग्णवाहिकेचा कसा वापर करावा याचे प्रात्यक्षिक चिखली आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर विशाखा पाटील यांनी आल्लाद पिंगळे वाहनचालकाला रुग्णवाहिका घेऊन पाठविले.

यदा कदाचित जर विंचु अथवा साप चावून मृत्यू झाला शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजने द्वारे 2 लाख रुपयाचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा कृषी अधिकार्‍यांमार्फत मिळतो याची माहितीही दिली. घरातील वीजेच्या वस्तू, लहान मुलांची सुरक्षा, पाणी बचत ची माहिती दिली. या कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक विनोद पाटील मनोज पाटील, पोलीस पाटील हर्षदा माने, आरोग्य सेविका मंथना पाटील, गुलशन औसेकर व अतोनात पावसातही 60 ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक निलेश गावंड यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य वसुधा पाटील यांनी केले.

Exit mobile version