। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या विद्यालयात जल पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रा सोनल ठकोरे यांनी प्रास्ताविक केले. .प्राचार्य साळुंखे यांनी जल संवर्धन तर तालुका समन्वयक धनंजय पाटील यांनी अभियानाची माहिती दिली. क्रीडा शिक्षक संभाजी ढोपे,सहा शिक्षक प्रा सोनल ठकोरे,बबन पालवे,पांडुरंग सूर्यवंशी, अशोक शिंदे,महेंद्र निकुंभ,स्वाती शिंदे,तन्मयी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदगाव विद्यालयात जल पे चर्चा
