। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्य सरकारच्या, राजकीय इतर मागासवर्गीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत, या भूमिकेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेल्या आहेत. तर, नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकाही सहा महिन्यासाठी लांबणीवर गेल्याची चर्चा आहे. ही निवडणूक आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत पाचवेळा तयारी करून निवडणूक लांबणीवर पडल्याने इच्छुक चांगलेच अडचणीत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थापेक्षा नवी मुंबई पालिकेची निवडणूक आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. तर, नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका सहा महिन्यासाठी लांबणीवर गेल्याची चर्चा सुरु आहे.