कर्जतमध्ये मातृत्वाला काळीमा

एकदिवसीय स्त्री जातीचे अर्भक दिले फेकून
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील वदप गावाशेजारी एकदिवसीय स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या बाळाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याचे समजतंय. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात मातापित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध कर्जत पोलीस करत आहेत. याबाबत कोणाला काही माहिती असेल, तर ती पोलिसांनी येऊन सांगावी, माहिती देणार्‍याचे नाव गुपित ठेवण्यात येईल, अस आश्‍वासन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.

Exit mobile version