। मुंबई । प्रतिनिधी।
जुहूमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये 75 वर्षीय व्यावसायिकाने एका 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सदर व्यावसायिकावर अंबोली पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बलात्काराच्या या गुन्ह्यात चक्क 1993 च्या मुंबई साखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाने महिलेला याची वाच्छता कुठेही न करण्यासाठी ‘डी कंपनी’ची धमकी दिली.
अंबोली पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, दादरमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकानं तिच्यावर अंधेरीच्या जे.बी. नगर येथील द ऑन टाईम हॉटेल इथे मे महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले आहेत. याच दरम्यान व्यावसायिकाने तिच्याकडून 2 कोटी व्याजाने घेऊन ते परत न केल्याचाही दावा तिने केला आहे. या पैशांसाठी त्याचबरोबर महिलेवर केलेल्या अत्याचारबाबत महिलेने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, व्यावसायिकाने महिलेला थेट दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे.