माथेरानमध्ये जंतुनाशक फवारणीस सुरुवात

| माथेरान | प्रतिनिधी |

प्रदूषण मुक्त माथेरानमध्ये शुद्ध हवा आणि गुलाबी गारवा, हिरवीगार गर्द वनराई यामुळे याठिकाणी सहसा कोणाला दीर्घ आजार उद्भवत नाहीत. परंतु, अनेकदा गावातील काही ठिकाणी वस्तीच्या भागात काही नागरिक आपल्या घरातील ओला कचरा गटारात टाकत असतात. त्यामुळे हे उष्टान्न कुजल्यामुळे त्याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. त्याचप्रमाणे उघड्या गटारांमुळे डासांची पैदास वाढत असते. त्या- त्या भागात दुर्गंधी पसरत असते. परिणामी नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होत असते. याकामी चंद्रकांत चौधरी यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन गावातील विविध भागात जंतुनाशक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यातुन किमान दोन वेळा अशाप्रकारे जंतुनाशक फवारणी केल्यास निश्चितपणे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन नागरिकांना आजाराला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही असे त्याचे म्हणणे आहे.

Exit mobile version