डिजिटल सातबारे यांचे वाटप व वाचन

नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वडवली येथे 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत डिजिटल सातबारे वाटप व वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कर्जत तालुका तहसीलदार विक्रम देशमुख, मंडळ अधिकारी संतोष जांभळे, विस्तार अधिकारी डी एच जाधव , नायब तहसीलदार सोपान बाचकर आदी मान्यवरांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी आसलचे तलाठी कांबळ,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र डोंगरे ,पंचायत समिती माज़ी सभापती अमर मिसाळ, आसल ग्रामपंचायत विद्यमान सरपंच रमेश लदगे, सदस्य दिनकर तळपे, सदस्य रुपेश कोंडे, , ग्राम तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी लदगे, माजी सरपंच अशोक तळपे आदी मान्यवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .

Exit mobile version