बौध्दजन पंचायत समितीतर्फे मदतीचे वाटप

। महाड । प्रतिनिधी ।
महाडमध्ये पुरग्रस्ताच्या मदतीचा ओघ अद्याप सुरुच असुन शहर आणि तालुक्यांतील पुरग्रस्त बौध्दचाछयांना बौध्दजन पंचायत समितीतर्फे आर्थिक मदतीचे वाटप नुकतेच करण्यात आले.
महापुरामुळे महाडकर नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले, अनेकांची घरे संसार उध्वस्थ झाले, अशा पुरग्रस्त कुटूंबांना मदत करण्यासाठी असंख्य सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करुन पुरग्रस्तांना आधार दिला. यामध्ये बौध्दजन पंचायत समितीच्या माध्यमांतुन पुरग्रस्त बौध्दाचाछयांना देखिल आर्थिक मदत देण्यांत आली. जितेंद्र साळवी, बबन शिंदे, यांचे पुरामध्ये प्रचंड नुकसान झाले. त्यांना पुन्हा उभे राहाण्यासाठी मोलाची मदत केली आहे. या प्रसंगी आयोजित करण्यांत आलेल्या मदत वाटप कार्यक्रमाला मनोहर मोरे, मनोहर जाधव,रविंद्र पवार,मंगेश पवार,बाळकृष्ण मोहिते, संदीप गमरे,संतोष तांबे,सुदेश गमरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version