भाऊसाहेब राऊत विद्यालयात सायकलचे वाटप

। कर्जत । वार्ताहर ।
रोटरी क्लब ऑफ ठाणे पूर्वने कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत विद्यालय कशेळे व चिंचवली-डिकसळ संस्थेतील विद्यार्थ्यांना 50 सायकलींचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत यांनी गरीब, गरजू आणि आदिवासी मुलां-मुलींना शिक्षण मिळावे म्हणून तालुक्यातील ग्रामीण भागातील कशेळे व डिकसळ येथे शाळा सुरू केल्या. कशेळे दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो, भाऊसाहेब राऊत विद्यालय कशेळे येथील विद्यालयात बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. या विद्यालयातील शिकत असलेल्या विद्यार्थिनी 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून चालत येत असतात, हे अंतर लक्षात घेता संस्थेचे राहुल तिटकारे आणि सतीश ठाणगे यांच्या प्रयत्नाने व रोटरी क्लब ऑफ ठाणे पूर्व यांच्या माध्यमातून भाऊसाहेब राऊत विद्यालयातील कशेळे व चिंचवली ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कैलास जेठाणी, श्रीरंग केतकर, ज्योती जाधवानी, रमेश जाधवानी, यतीश कुरील, सचिन घाग, सुधीर झाडकर, सतीश ठाणगे, राहुल तिटकारे, सूर्याजी ठाणगे, तानाजी मते, सुरेश सावंत, सिद्धार्थ प्रधान तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version