अपंगांना ब्लँकेट वाटप

। नेरळ । वार्ताहर ।
विमल म्हात्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त किरवली ग्रामपंचायत हद्दीतील अपंगांना चादर आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वाकलन येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर रतन म्हात्रे यांच्या माध्यमातून आईच्या स्मृतीप्रित्यर्थ कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी मनोहर म्हात्रे, चंद्रकांत गायकर, जगदीश मालुसरे, धनराज चौधरी, गोविंद कांबळी, सुरेश चव्हाण, योगेश बेडेकर यांच्यासह अपंग संघटनेचे अमर साळोखे, पंकेश भोईर, धनाजी हाडप आदी उपस्थित होते. यावेळी तेथील 50 व्यक्तींना साहित्याचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version