आदिवासी महिलांना ब्लँकेट वाटप

नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे आणि कळंब आउट पोस्ट पोलीस ठाणे हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील 350 आदिवासी महिलांना थंडी पासून बचाव करणारे ब्लँकेट भेट म्हणून देण्यात आले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि अंकित परमार ग्रुपच्या वतीने सहा आदिवासी वाडीमधील महिलांना ब्लँकेट वाटप केले. थंडीचे दिवस सुरू झाले असून पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांच्या पुढाकाराने आदिवासी लोकांना ब्लँकेट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.आज 7 नोव्हेंबर रोजी नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील आसलवाडी आणि बेकरेवाडी येथील महिलांना जुम्मापट्टी येथे झालेल्या कार्यक्रमात थंडी पासून बचाव करण्यासाठी 100 ब्लँकेटचे वाटप केले.त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचीम,उद्योजक अंकित परमार,त्यांचे सहकारी नेहुल जैन अन्य सहकारी उपस्थित होते.तर आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, तसेच कर्जत तालुका अध्यक्ष जैतु पारधी,किसन ढोले,हरीचंद्र बांगारे,सुरेश दरवडा,सुरेश केवारी, लक्ष्मण दरवडा आदी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांच्या पुढाकाराने कळंब आउट पोस्ट पोलीस ठाणे येथील आदिवासी आणि कातकरी वाडी मधील तब्बल 250 ब्लँकेटचे वाटप केले गेले.त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भालचीम, एएसआय शेमडे,पारधी,पोलीस नाईक गर्जे, नागरगोजे,समीर भोईर,दवणे तसेच अंकित परमार आणि अन्य उपस्थित होते.सहा वाड्यांमधील आदिवासी समाजाच्या 350 महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version