माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत आदिवासी बांधवाना कपडे वाटप

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
पोलीस खात्यात आपले कर्तव्य बजावत असताना कायद्याचे पालन करून आपली कर्तव्य पार असताना सामाजातील काही घटक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने गोरेगाव पोलीस ठाण्याच्या संकल्पनेतून माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रम गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या पुढाकारने आदिवासी बांधवांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.

माणुसकीची भिंत या समाजपयोगी उपक्रमांतर्गतजवळजवळ 150 आदिवासी बांधवांना कपड्यांचे वाटप केले.या कपड्यांमध्ये महिलांना साड्या, लहान मुलांना कपडे, खाऊ,टॉवेल, ड्रेस, जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, पॅन्टपीस,शर्ट पीस, इत्यादी कपड्यांचे वाटप उपक्रमाद्वारे वाटप करण्यात आले. यावेळी दिनेश गोरिवले, समीर आगरे,प्रथमेश बामणोलकर, मयूर बामणोलकर, यज्ञेश संवादकर, सुजल म्हापलकर सुजल मोरे, कैलास रातवडकर, सुमित रातवडकर, तन्मय बामनोलकर, यांनी सदर कपडे वाटप करण्यासाठी सहकार्य केले

आपल्या परिसरात असणारा गोरगरीब आदिवासी बांधव अनेक सुविधांपासून वंचित आहेत त्यांना मदत करणे आपले कर्तव्य असून गोरगरिबांच्या चेहर्‍यावर आनंद समाधान दिसणे त्यांना मदत करणे यासारखी मोठी दिवाळी असू शकत नाही त्यांच्या चेहर्‍यावर आनंद हसू समाधान हीच खरी आमची दिवाळी.

– श्रीकृष्ण नावले, गोरेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक
Exit mobile version