गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
कोरोना प्रादुर्भावाच्या कठिण काळात साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने विद्यार्थी वर्गासाठी एक हात मदतीचा पुढे करीत सदर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. साई फाऊंडेशनचे चेअरमन असिफ कासकर व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विरेश कोठारी यांच्या सर्वोतोपरी सहकार्याने सदर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी यावेळी येथील सरपंच वसंत भोईर, सदस्य दयाराम भोईर, युवा कार्यकर्ते मंगेश ठाकूर, सहदेव भोईर, विश्‍वनाथ थिटे, मुख्याध्यापक सचिन टिकुळे, सहा.शिक्षक विठ्ठल हाके आदी उपस्थित होते.

Exit mobile version