विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

। तळे । वार्ताहर ।
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. क्षमा देशमुख-कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यासाठी 50 हजार रुपये देणगी दिली. गेले 5 वर्ष त्या सातत्याने शैक्षणिक साहित्यासाठी देणगी देत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे हे होते, तर व्यासपीठावर किरण देशमुख, डॉ. सतीश वडके, दीपक कोटिया, मारुती शिर्के, बी. के. पटेल, नेत्रा देशमुख, ऋत्ता देशमुख, प्रकाश गायकवाड हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सचिन भाटे,  नितेश साबळे, मनीषा बांगर, अनंन्या महाडकर, दिपाली पाटील, अमृता हाटकर, सुजाता खातू,  संचिता कांबळेकर, मानसी चिले, अलका जाधव यांनी खूप परिश्रम घेतले.

Exit mobile version