। म्हसळा । वार्ताहर ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी संपर्कप्रमुख शेखर सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षण हे वाघिणीचे दूध म्हटले जाते; परंतु आर्थिक अडचणीमुळे असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. सध्याची वाढती महागाई पाहता शिक्षणासाठी लागणारे साहित्यही अतिशय महाग झाले आहेत. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी मनसे नेते शिरीष सावंत, जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक साहित्य वाटप केले असल्याचे शेखर सावंत यांनी सांगितले.