क्षयरोग रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

| पनवेल | प्रतिनिधी |

जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय क्षयरोग धुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना संपूर्णता: रोगमुक्त करण्यासाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींचा अरविंद म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी म्हात्रे यांनी महापालिकेत काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्कर्सचे विशेष कौतुक केले. तसेच, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबाबत शासनाला धन्यवाद देत, या विषयावर जनजागृती करून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, प्रमिला पाटील, प्रकाश बिनेदार, बबन मुकादम, हरेश केणी, दर्शना भोईर, प्रिती जॉर्ज, रविनाथ पाटील, पालिकेचे उपायुक्त आरोग्य अधिकारी, कर्मचारी परिचारिका, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version