सचिन घाडी यांची सामाजिक बांधिलकी
| सोगाव | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी 30 मार्च 2026 रोजी आपला वाढदिवस विविध कार्यक्रमांसह साजरा केला. या दिवशी त्यांनी आपला वाढदिवस परहूर येथील श्री समर्थ वृद्धाश्रमातील वृद्ध महिला व पुरुष बांधवांसह केक कापून साजरा केला. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धाश्रमातील वृद्धांना लागणारे कांदा, बटाटा, तांदूळ, तेलाचे डबे व इतर जीवनावश्यक साहित्य व काही प्रमाणात आर्थिक मदत वृद्धाश्रमाचे संस्थापक ऍड. जयेंद्र गुंजाळ यांच्याकडे सुपूर्द केली.
या कार्यक्रमाला मुनवली येथील ज्येष्ठ नागरिक दिलीप मोंढे, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, जयेश ठकरूळ, गीतेश ठकरूळ, महेश नागावकर, निकेश अनमाने, रोशन पुजारी, साची घाडी, पवित्र नागावकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन घाडी यांना सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील राजकीय व सामाजिक तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोनवरून, काहींनी सोशल मीडिया तसेच काहींनी प्रत्यक्ष भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
