विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट, शैक्षणिक साहित्याचे वाटप

| खांब | वार्ताहर |

रुपेन तन्ना मेमोरियल ट्रस्ट व कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई यांच्यावतीने रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे व न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी विद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट व शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

रूपेन तन्ना मेमोरियल ट्रस्टच्या प्रमुख अ‍ॅड. उषा तन्ना यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मधुमती रच्चा, रितवाज रच्चा, विजय सर, खुशबू शहा, असिता निरे, रचना वर्मा, रवी बलसारे, मुख्याध्यापक दिपक जगताप, नरेंद्र माळी, संदेश गायकवाड, विश्‍वनाथ जाधव, दिपक मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अ‍ॅड. उषा तन्ना यांचे दिवंगत सुपुत्र अ‍ॅड. रूपेन तन्ना यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी त्यांचे हे कार्य सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यी व समाजातील गरजवंत व्यक्ती यांच्या सहयोगासाठी सुरू असल्याचे तसेच, कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई या संस्थेचेही कार्य याप्रमाणेच सुरू असल्याची माहिती यावेळी आयोजकांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version