अक्कादेवीवाडीला धान्य साठवण टाकीचे वाटप

| चिरनेर | प्रतिनिधी |

कोंढरी करंजा येथील शिक्षणप्रेमी दिनेश नारायण म्हात्रे आणि स्नेहबंध समूह उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच उरण तालुक्यातील चिरनेर अक्कादेवीवाडी येथे धान्य साठवण टाकीचे वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्याचे दातृत्व जपण्यासाठी एकत्र आलेल्या स्नेहबंध समूहाचा वार्षिक गेट-टुगेदर मेळावा चिरनेर येथील ऐतिहासिक भूमित अक्कादेवी डोंगरावर साजरा झाला. या वार्षिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, आदिवासी बांधवांना धान्य साठवण टाकीचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या उत्पन्नाचा एक वाटा समाजासाठी अर्पण करावा, ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणाऱ्या दिनेश म्हात्रे आणि मच्छिंद्र म्हात्रे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून कौतुक केले. मानवी जीवन हे एखाद्या वृक्षाप्रमाणे परोपकारी झाले पाहिजे, यासाठी प्रत्येकाने धडपडत रहावे, असे आवाहन देखील उरण कोमसापचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी प्रास्ताविकेतून केले. यावेळी चिरनेर अक्कादेवीवाडी येथील 40 आदिवासी बांधवांना धान्य साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास दिनेश म्हात्रे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघा उरण तालुका अध्यक्ष महेंद्र गावंड, उरण शिक्षक पतपेढीच्या संचालिका शर्मिला गावंड, चिरनेर ग्रामपंचायत उपसरपंच दीपक कातकरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशव गावंड, विकास पाटील, मनोहर वर्तक, दिशा तांडेल, प्रमिला गावंड, संगिता गावंड, प्रतिभा लहाशे, संगिता म्हात्रे, प्रतिभा पाटील, संपदा चव्हाण, विनिता पाटील, पांडूरंग ठाकूर, अखिलेश ठाकूर, अनिकेत नाईक, भारती बगाटे, जलतरणपटू मयंक म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version