सेवा सहयोगच्यावतीने हेल्मेटचे वाटप

। पनवेल । वार्ताहर ।

सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबईच्यावतीने पालकांना आणि त्यांच्या मुलांना 130 हेल्मेटचे वाटप पनवेल येथील कश्यप हॉलमध्ये संपन्न झाले. सेवा सहयोग फाऊंडेशनचे ग्रामविकास, स्कूल किट, विद्यार्थी विकास शिष्यवृत्ती, बुक बँक, फिरती विज्ञान प्रयोगशाळा, कम्यूनिटी नॉलेज हब, अभ्यासिका आणि राईट टू सेफ्टी अश्या खूप सार्‍या प्रकल्पावर त्यांच्या माध्यमातून काम सुरु आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या विद्यमाने आयसीआयसीआय लोंबार्ड यांच्यातर्फे पालकांना आणि त्यांच्या मुलांना 130 मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, जयश्री सानप, माधवी पाटील, गणेश संसारे आणि सूरज शिंदे उपस्थित होते.

Exit mobile version