माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालयात औषध वाटप


| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे शनिवार दि.6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त औषध व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माणगाव तालुका पत्रकार संघ गेली सहा वर्षे सातत्याने पत्रकार दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी औषधे व फळवाटप कार्यक्रम करीत आहेत.

यावेळी औषध वाटप कार्यक्रम राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ॲड. राजीव साबळे, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, रामनारायण मिश्रा, सुभाष केकाणे, दिपक जाधव, राजेश मेहता, भालचंद्र खाडे, आनंद यादव, खेमचंद मेथा, सुभाष दळवी, बाबू खानविलकर, संजय गांधी, दिनेश रातवडकर, कपिल गायकवाड, अजित तारळेकर अँड. केदार गांधी, ॲड.सदफ येलुकर, योगिता चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन गोमसाले, अमोल कुलकर्णी, अल्ताफ धनसे, राजेंद्र खाडे, प्रा. हर्षल जोशी, उणेगाव ग्रामपंचायतीचे राजेंद्र शिर्के, विनोद घायाळ, राहुल दसवते, अरुण क्षीरसागर, निलेश म्हात्रे, उमेश यादव, माजी नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Exit mobile version