क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप

| अलिबाग | प्रतिनिधी |

क्षयरोगमुक्त जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषक आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद, अलिबाग येथे करण्यात आले.

जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटप देण्यासाठीचे अहवान केले होते त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने ही कार्यवाही केली. पोषणयुक्त आहारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा व प्रतिकारशक्ती मिळते, ज्यामुळे रोगमुक्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. महानगर गॅस लिमिटेडने या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवत रुग्णांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर, महानगर गॅस लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष संकेत धोत्रे, मुख्य व्यवस्थापक, सुसंता कुमार राऊत , सहाय्यक व्यवस्थापक प्रियांका दळवी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version