आदिवासींना ताडपत्रीचे वाटप

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

श्रीमद राजचंद्र अक्षम वलसाड गुजरात, नवी मुंबई यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडींमध्ये 500 ते 600 ताडपत्रींचे वाटप करण्यात आले.

पनवेल तालुक्यातील वाकडी गावचे माजी सरपंच नामदेव जमदाडे यांच्या पुढाकाराने श्रीमद राजचंद्र आक्षम वलसाड, गुजरात, नवी मुंबई यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील वाकडी आदिवासी वाडी, मोरबे आदिवासी वाडी, महाळुंगी वाडी, खैरवाडी, गारमाळ फणसवाडी, नेरेपाडा आदिवासी वाडी अशा अनेक वाड्यांमध्ये साधारण 500 ते 600 ताडपत्री वाटप करण्यात आल्या. यावेळी समाजसेवक रवींद्र पाटील (कोंडले), दिनेश फडके (मोरबे), पत्रकार मयूर तांबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version