| रसायनी | वार्ताहर |
पंतप्रधान भारत सरकार यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ झाला आहे. ग्रुप ग्रामपंचायत लोधीवली यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्णत्वास आणि मंजुरी मिळाली त्यांना ई-प्रणाली माध्यमातून घरकुलांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजना नियम व अटीनुसार घर नसलेल्या किंवा गरीब परिस्थितीत राहणार्या कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारने सन 2016 मध्ये एक कार्यक्रम सुरू केला. ग्रामीण भागातील या कुटुंबांसाठी मूलभूत गरजा असलेली घरे बांधण्याचे उद्दिष्ट नक्की करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 2 कोटी घरे बांधली आहेत, जे 2.72 कोटी घरांच्या ठरलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ग्रुप ग्रामपंचायत लोधीवली येथे ग्रामीण टप्पा दोन व अंतर्गत घरकुलांना मंजुरी मिळाली, त्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आला तर पूर्ण झालेल्या घरकुलांची ई-चावी देण्याचा घरकुलांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत लोधिवली कार्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे, सुशीला भुईकोट, भारती चाळके, मंगल वाघमारे, निखिल पाटील व ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोल्हार, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत, लाभार्थी विष्णू पवार, मारुती पवार, मंगल मोरे, विमल वाघमारे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.