सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद क्षेत्रात सफाई काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ठेकेदाराच्यावतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी 60 सफाई कामगारांना हे वाटप करण्यात आले. कर्जत नगर परिषदेच्यावतीने नगरपरिषद हद्दीतील स्वच्छतेचा ठेका अशोक स्वच्छता सेवा मंडळ (नवी मुंबई ) या संस्थेस देण्यात आला आहे, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, कामगारांना ठेकेदाराच्यावतीने रेनकोट देण्यात आले आहेत त्याचे वाटप नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, बांधकाम विभागाचे रविंद्र लाड,अजय देशमुख, राहुल गायकवाड, रामचंद्र भासे, दिनेश काकडे, अनिल खाडे यांच्या सह सफाई कामगार उपस्थित होते.

Exit mobile version