। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद क्षेत्रातील 105 दिव्यांग लाभार्थींना 5 लाख 12 हजार रुपयांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. नगरपरिषदेच्यावतीने नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थींना आवाहन करण्यात आले होते. सप्टेंबर 2021 अखेर पर्यत 105 लाभार्थीनी नगरपरिषदकडे आपले अर्ज दाखल केले होते. या सर्वांना नगरपरिषद फंडातून लाभ देण्यात आला. 103 दिव्यांग लाभार्थींना थेट लाभार्थीच्या बँक खात्यात प्रत्येकी 4 हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली. तर दोन लाभार्थींना दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी 50 हजार रुपये मोटार सायकल साठी देण्यात आले. असा एकूण 5 लाख 12 हजार रुपयांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. दिव्यांगाचे प्रमाण पत्र आणि अटी शर्तीनुसार हे वाटप होत असते. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, राहुल डाळींबकर, स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, मधुरा चंदन, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत, दिव्यांग कल्याण निधी लिपिक बापू बहिरम, लाभार्थी, नगरपरिषद कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.