| म्हसळा | प्रतिनिधी |
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंडिया चिल्ड्रेन झोन या सामाजिक संस्थेचे प्रमुख कमलेश मेहता व पारुलबेन मेहता यांच्या आर्थिक सहकार्याने समाजसेवक रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून जिजामाता हायस्कूल वरवठणे आगरवाडा येथे शिक्षण घेत असलेल्या सन2024-25 या शैक्षणिक वर्षातील 50 गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले. याकार्यक्रमाप्रसंगी इंडिया चिल्ड्रेन झोन संस्थेचे संस्थाप्रमुख माजी सभापती महादेवराव पाटील, संचालक मुकेश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संदिप कांबळेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्कॉलरशिप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून येत होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा प्रशासन व उपस्थित पालकांनी इंडिया चिल्ड्रेन झोन संस्था तसेच सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले.
गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वितरण
