। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील राजखलाटी या गावचे नागरिक व मुंबई येथे वास्तवास असलेले सुधीर मारुती मराठे यांनी व त्यांचे मित्र संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने विविध शालेय साहित्याचे वाटप केले.
यावेळी सुधीर मराठे व त्यांचे मित्र संजय पाटील यांनी 64 विद्यार्थ्यांना स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिका व चप्पल तसेच अन्य शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी तर जोपासलीच याशिवाय एक प्रेरणादायक उपक्रम संपन्न केला असल्याचे परिसरात बोलले जात आहे. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण धनावडे, सदस्य रोशनी बारस्कर, वर्षा गोफन यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व साहित्य मिळाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.