| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने मा.आ. बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.14) खारघरमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये स्थानिक नागरिकांना विविध दाखले वाटप आणि मिळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल प्रमाणपत्र आदी देण्यात आले. या संधीचा लाभ खारघरमधील साडेचारशे जणांनी लाभ घेतला.
या विविध दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, जिल्हा महिला सरचिटणीस तेजस्वी घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, तालुका चिटणीस राजेश केणी, महानगरपालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे व माजी नगरसेवक शंकर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पनवेलच्या नायब तहसीलदार राजश्री जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी विशेष मेहनत घेतली. त्यांनी खारघरमधील स्थानिक नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप केले आणि त्यांना मार्गदर्शन केले.
शेकापच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध दाखले वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गिरमकर, जगदीश घरत, जयेंद्र शेळके, विनोद लाड, प्रतीक ढोबळे, जयेश कांबळे, अभय मोरे, किरण जाधव, सुमित ठाकूर,विलास ठाकूर, परमेश्वर मुसने आदींनी विशेष मेहनत घेतली.