दिव्यांगांना जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप

। कोर्लई । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीतर्फे प्रथमच दिव्यांगांसाठी आयोजित कार्यक्रमात सरपंच अजय नाईक व निलेश गायकर यांच्या हस्ते दिव्यांगांसाठी असणार्‍या पाचटक्के निधीतून जीवनोपयोगी विविध साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना वॉटरप्युरिफायर, कुलर, व्हीलचेअर, कमोड, फॅन आदी जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. याचा 64 लाभार्थींना लाभ मिळाला.

याप्रसंगी संदेश पडवळ, निधी पाटील, सुचिता म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, विजय गायकर, संदेश शिंदे, अनिकेत नाईक, नारायण शिंदे, सुरेश धसाडे, रामदास शिंदे, दक्षता पाटील, अनंत म्हात्रे, आनंद शिंदे, गोपाळ शिंदे, शैलेश नाईक यांसह दिव्यांग लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निशांत पाटील यांनी केले.

Exit mobile version