| मुंबई | प्रतिनिधी |
ठाणे जिल्हा कॅरम संघटनेच्यावतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला 28 मार्चपासून बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृह, तीन हात नाका येथे सुरुवात झाली आहे. 28 ते 31 मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 350 खेळाडू सहभागी होणार असून, चार दिवस कॅरमचा रोमांचक थरार पाहायला मिळत आहे. पुढील दिवसांत पुरुष एकेरी, सांघिक गट, महिला व ज्येष्ठ गटातील सामने रंगणार असून, 31 मार्च रोजी अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. या स्पर्धेत 20 संघांसह पुरुष एकेरी, दुहेरी, महिला व ज्येष्ठ गटातील सामने खेळवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय मांडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पंकज पवार तसेच इम्रान अहमद, अस्लम चिकटे, अब्दुल सत्तार यांसारखे नामांकित खेळाडू सहभाग घेणार आहेत.
ठाण्यात जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
