डेरवण येथे 28 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा

। डेरवण । प्रतिनिधी ।
जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व डेरवण श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता डेरवण क्रीडा संकुल येथे होणार आहे. स्पर्धेसाठी एकूण 50 हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
रन फॉर द नेशन हे या स्पर्धेचे ब्रीद वाक्य आहे. ही स्पर्धा एकूण आठ गटात होणार असून यामध्ये 12, 14, 16 आणि 18 वर्षाखालील मुले व मुली यांचा समावेश आहे. 12 वर्षे मुली – मुले व 14 वर्षे मुली या गटासाठी 2 किमी, 14 वर्षे मुले व 16 वर्षे मुली या गटासाठी 3 किमी, 16 वर्षे मुले व 18 वर्षे मुली या गटासाठी 4 किमी आणि 18 वर्षाखालील मुलांसाठी 6 किमी अंतर ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या स्पर्धकांना एकूण रोख 50 हजार रुपयांची बक्षिसे व पहिल्या तीन क्रमांकांना मेडल देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व खेळाडूंना टी-शर्ट, कॅप देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी 9822639306, 9325897877, 6422430799, 9623969961, 8805228922 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version