उणेगाव येथे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

लहान गटात मल्लिका ग्रुप, मोठया गटात जय गणेश ग्रुप विजयी

| माणगाव | वार्ताहर |

तालुक्यातील श्री काळभैरव मुंबईकर मंडळ सत्वे आळी यांनी उणेगाव येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात मल्लिका ग्रुप राजिप शाळा वाढवण ता. माणगाव याना प्रथम क्रमांक 5000 रुपये व आकर्षक चषक, तर मोठया गटात जय गणेश ग्रुप संघ म्हसळा व निलेश म्हात्रे उरण याना प्रथम क्रमांकाचे बक्षीस 7000 रुपये व आकर्षक चषक विभागून देण्यात आले.

या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत लहान गटात द्वितीय क्रमांक जिया माने वैयक्तिक-म्हसळा, सानिध्या नागे माणगाव यांना 3000 रुपये व आकर्षक चषक विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांक वावे स्कुल ग्रुप ता. माणगाव सांघिक यांना 2000 रुपये व आकर्षक चषक, मोठया गटात द्वितीय क्रमांक सहयोग साळवी व तेजस लाड यांना 5000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक वैयक्तिक मनाली निवालकर महाड यांना 3000 रुपये व आकर्षक चषक देण्यात आले. जिल्हास्तरीय या नृत्य स्पर्धेत लहान गटात 22 ग्रुप तर मोठ्या गटात 18 ग्रुप सहभागी झाले होते.

स्पर्धेतील सर्व विजय स्पर्धकांना उपस्थित मान्यवरनच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण माणगाव येथील काजल डान्स अकॅडमीच्या संस्थपिका काजल पाखुर्डे व प्रा. प्रणय मनोहर इंगळे यांनी केले. हेमंत बारटक्के यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंकर शिंदे व विठ्ठल गुणाजी सत्वे, श्री काळभैरव मुंबईकर मंडळ सत्वे आळी ग्रामस्थ उणेगाव यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version