जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

के.वि. कन्या विद्यालयाला विजेतेपदाचा दुहेरी मुकट

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगर पालिका जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा लोकनेते माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय, कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 14 वर्षे वयोगट व 17 वर्षे वयोगटात विविध मातब्बर शाळांनी सहभाग घेतला होता. सुधागडची बांटीया, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कळंबोली, चांगु काना ठाकूर, सेंट जोसेफ अशा अनेक मातब्बर संघ सहभागी झाले होते. या सर्व संघांना को.ए सो.ची केशव वीरजी कन्या विद्यालयाच्या मुलींनी पराभूत करून 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून दिला.

या यशाबद्दल शाळेचे चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील, शाळा समिती सदस्य प्रीतम म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती दलाल ,शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका लता ठाकूर व लेखा मर्चंडे यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version