। नवीन पनवेल । वार्ताहर ।
प्रभादेवी, मुंबई येथील नामांकित कामगार क्रीडा भवन येथे राज्य सब ज्युनियर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर या पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न झाल्या. ही स्पर्धा महाक्रिडा प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टीग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने 13 पदके पटकाविली.
रायगड संघाने स्पर्धेत सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, आणि मास्टर या सर्व गटात सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यामधील खेळाडूंनी 13 पदके मिळवून जिल्हाचे नाव उंचावले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींगचे जनरल सचिव संजय सरदेसाई, रायगड जिल्हा संघटना अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सह सचिव सचिन भालेराव, सदस्य संदीप पाटकर, राहुल गजरमल, आणि कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांनी खेळाडूंचे कौतुक केले. स्पर्धेच्या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू संतोष गावडे यांनी खेळाडूंना बहुमोल मदत केली.
स्पर्धेतीन पदक प्राप्त खेळाडू पुढीलप्रमाणे –
सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू : कुणाल पिंगळे (ज्युनिअर स्पर्धा)
कमल जोशी (ज्युनिअर स्पर्धा)
अमृता भगत (सीनिअर स्पर्धा)
निकर्ष जाधव(ज्युनिअर स्पर्धा)
महेश कृष्णा पाटील (मास्टर स्पर्धा)
रौप्यपदक प्राप्त खेळाडू
विनायक पाटील (मास्टर स्पर्धा)
अथर्व लोधी (ज्युनिअर स्पर्धा)
कांस्य पदक प्राप्त खेळाडू
आरती शिंदे (सब ज्युनिअर स्पर्धा)
प्रथमेश भालेकर (ज्युनिअर स्पर्धा)
प्रितम मंडल (सीनिअर स्पर्धा)
रोशन पाटील.(सीनिअर स्पर्धा)
शुभम कांगले (सिनिअर स्पर्धा)
राजेश अगंद (मास्टर स्पर्धा)