पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिव्या महाडिकची भरारी


| खोपोली | वार्ताहर |
करंबेली,ता.खालापूर येथील दिव्या शेखर महाडिक हिने पॉवरलिफ्टींगमध्ये विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्तरीय स्पर्धेत ती दुसर्‍या क्रमांकाची मानकरी ठरली आहे.तिने कांस्यपदकाची कमाई केली आहे.याबद्दल खालापूर तालुका शिक्षण मंडळातर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले.
दिव्या शेखर महाडिक ही खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाच शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन जीवनातच तिला पॉवरलिफ्टिंगबाबत आवड निर्माण झाली.तिचा भाऊ सूरज महाडिक यांनी ही स्पर्धा खेळण्यासाठी कोच म्हणून भूमिका बजावत दिव्याला पाठिंबा दिला.

पनवेल येथे जिल्हास्तरीय निवड स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या दिव्याला पुणए येथे राज्य क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.यासाठी सुरज महाडिक यांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. याचबरोबर शुभम कंगले विक्रांत गायकवाड अमृता भगत ,दिशा कोठारी ,करन पापल यांचीही मोलाची साथ आणि वेगवेगळ्या पध्दतीने मार्गदर्शन मिळाले.त्यामुळे दिव्याचा आत्मविश्‍वास दुणावला. पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत तिला कांस्यपदकाची कमाई करता आली. माझ्या यशाचे श्रेय माझ्या घडविणार्‍या शिक्षकांचा आणि आई वडिलांना जात असल्याचे दिव्याने सांगीतले आहे.तिच्या या यशाबद्दल रायगड जिल्हा प्रेस क्लब चे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी दिव्याचे अभिनंदन केले.

Exit mobile version