दिव्या ठाकूरचे मॅरेथॉन स्पर्धेत यश

। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए येथील सेंट मेरी स्कूलमधील विद्यार्थिनी दिव्या ठाकूर हिने न्यू पनवेल मॅरेथॉनमध्ये दुसरा, तर पुणे मॅरेथॉनमध्ये चौथा क्रमांक पटकाविला आहे. दिव्याच्या या यशाबद्दल सेंट मेरी स्कूलचे मुख्याध्यापक राजेश अल्फान्सो, क्रीडा शिक्षक हरिश्‍चंद्र धोंडकर, लुक्की स्पोर्ट्स अकादमीचे लक्ष्मण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. तसेच धुतूम ग्रामस्थांनी दिव्या व वडील महेंद्र ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version