800 मीटर धावण्यात रौप्य पदकाची कमाई
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये दिव्या अनंत मोकल पीएनपी कॉलेज अलिबाग हिने 800 मीटर धावणे या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळून आपले नाव अश्वमेध क्रीडा स्पर्धांसाठी निश्चित केला आहे.
पीएनपी महाविद्यालयात एसवाय बीए या वर्गात शिकणारी दिव्या अनंत मोकल हिने 2022-23 या वर्षात आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळून आपल्या गावाचे तसेच महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. दिव्या ही मांडवखार या गावची रहिवासी आहे. ती साई स्पोर्ट सेंटर, गोवा येथे खेळाविषयी प्रशिक्षण घेत आहे. तसेच तिच्या या कामगिरीमध्ये मोलाचा वाटा तिच्या पालकांचा देखील आहे तिचे वडील अनंत मोकल हे तिला कायम प्रोत्साहन देत असतात. ती पीएनपी महाविद्यालयामध्ये शिकत आहे. तिने या केलेल्या कामगिरीबद्दल पीएनपी सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य ओमकार पोटे, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.