| सुकेळी | प्रतिनिधी |
नुकताच सर्वच ठिकाणी दिवाळीचा सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी एक आपुलकीची व सामाजिक भावना जपत पेण येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत अहिल्या वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांच्यासह अतिशय उत्साहात त्यांची दिवाळी साजरी केली. पुढील काही दिवसांत सुरू होणाऱ्या थंडीपासून वृद्धांचे संरक्षण होण्यासाठी ब्लॅकेंट तसेच सोबत फळांची भेटवस्तू देऊन सर्वांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी सर्वच वृद्धांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पेण शहर अध्यक्ष प्रणेश पोवळे, तालुका मुख्य सल्लागार वैभव चोणकर, तालुका अध्यक्ष योगेश म्हात्रे, उपशहराध्यक्ष संदिप पाटील, उपतालुका अध्यक्ष चंदन अहिरे, महिला तालुका अध्यक्षा शैला तुरे, पियुष रामधरणे, सदस्या सचिता रागटी, हरिश्चंद्र तांडेल, आदी उपस्थित होते.







