अतिवृष्टीच्या संकटात संप करुन शेतकऱ्यांना वेठीस धरु नका – मोहन गुंड

तलाठी मंडळ अधिकार्यांनी संप मागे घेण्याची शेकापची मागणी

बीड | प्रतिनिधी |

अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्या साठी मंडळाधिकारी तलाठ्यांनी संप करून दुष्काळात तेरावा महिना आनला आहे . (पुण्याचे समन्वयक जमावबंदी आयुक्त रामदास जगताप ) यांनी तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष यांना अपमानास्पद बोलल्यामुळे तलाठी मंडळी आधिकार्यानी महाराष्ट्रात संप करुन राज्यात प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार यांच्याकडे ( डि ए सी) जमा केल्या आहेत यामुळे सर्व कामकाज बंद आहे, सुरु असलेला संप परिस्थितीची जन ठेवून तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,

शासकीय अधिकारी यांच्या अंतर्गत मुद्दा आहे तो अधिकारी स्तरावर बसून सोडवावा जर एखाद्या व्यक्तीला अपमानास्पद बोलल्यामुळे राज्यातील सामान्याना लोकाना कोरोना सारख्या महामारीत अतिवृष्टी सारख्या संकटात शेतकर्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे, अधिकार्यांची अपमानास्पद बोलनं बरोबर नाही पन चालु असलेला संप मागे घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन आधिकार्यांनी करावे, एकतर कोरोना महामारीत नंतर अतिवृष्टीमुळे शेतकरी हेराण कोण आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे, दिवसे न दिवस जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे ,शासनाने मदतीची घोषणा केलेली रक्कम दिवाळी पुर्वी शेतकर्याना मळणे गरजेचं आहे तलाठी मंडळ अधिकारी संपामुळे सातबारा आठ अनुदानाच्या याद्या ऑनलाइन करणे सर्व सर्व काम खोळाबले आहेत तात्काळ संप मागे घ्यावा, संप मागे घेणार नसतील शेतकर्याना वेठीस धरणाऱ्या मंडळ अधिकारी तलाठी याच्यावर कारवाई करावी,अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड अॅड भाई गोले पाटील अॅड संग्राम तुपे,भाई सौरव संगेवार अर्जुन सोनवणे भिमराव कुटे दत्ता प्रभाळे निलेश थेटे नवनाथ जाधव बाळू तरकसे अमोल सावंत सुमंत उंबरे अशोक रोडे अनिल कदम मुंजाबा पंचाळ वजीर शेख यांनी दिला आहे.

Exit mobile version