ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित

। खारघर । प्रतिनिधी।

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ याने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता.


श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


यावेळी अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो श्रीसेवक उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version