डॉक्टर सेल उपाध्यक्षपदी डॉ. आशिष बांदेकर

। पनवेल । वार्ताहर।

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित डॉक्टर सेल उपाध्यक्षपदी पनवेलचे डॉक्टर आशिष बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार अनिल परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार परब यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर आशिष बांदेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर आशिष बांदेकर सुकापुर येथे शिवसेनेचे काम करत आहेत. त्यांच्या कामाची दाखल घेत डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद जाजू आणि डॉक्टर कमिटीकडून संधी मिळाली आहे. डॉक्टर आशिष बांदेकर यांनी नियुक्तीनंतर शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन शुभेच्छा घेतल्या. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर बडे, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, विभागप्रमुख विशाल भोईर, सुकापूर शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे, देवद शाखा प्रमुख सुरेश माने, अनिल पाठक, भिकाजी चव्हाण, हितेंद्र सोलकर, बिपिन झुरे, सचिन खरात, सिदेश चव्हाण, मनोहर कदम आदी उपस्थित होते. त्यांनी बांदेकर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version