पीएनपी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर भूगोल विभागाचे प्रा. नितीन कराळे, इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील यांनी देशाच्या विकासामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उल्लेखनीय कार्यावर भाष्य केले. आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, ग्रंथालय प्रमुख कांचन म्हात्रे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सुजित पाटील, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा.मिलिंद घाडगे यांनी केले.

Exit mobile version